शिबिर - उन्हाळी सुट्टी

Shishu Ranjan & Hasthkala Sangam    09-Dec-2019
Total Views |
बालपणापासूनच कलेविषयी गोडी निर्माण व्हावी व आपणही काहीतरी बनवू शकतो यासाठी एप्रिल मध्ये १० दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात येते. शिबिराची वेळ दुपारी ४.३० ते ६.३० अशी असते. मुलांचा वयोगट ५ ते ११ वर्षे असा असतो. शिबिरासाठी लागणारे वस्तुनिर्मिती साहित्य शाळेतूनच दिले जाते.
 
शिबिराची सुरुवात प्रार्थना व श्लोक म्हणून होते. शिबिरात ताई काय शिकवितात याची बालकांना उत्सुकता वाटत असते. नंतर खेळ सूर्यनमस्कार घेतले जातात. एक दिवस थंडगार पाण्यात डुंबण्याचाही आनंद मुले घेतात. शिबिरात १० दिवसांत ग्रिटिंग, ओरिगामी, क्रेपची फुले, वारली पेंटिंग, आईस्क्रीम स्टिकचे वॉल हँगिंग, फुग्यावरील कोलाज काम, बर्थ डे कॅप, मातीचे दिवे इ. शिकविण्यात येते.
 
शेवटी शिबिरात १० दिवसांत शिकविलेल्या सर्व वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. प्रमुख अतिथी व मान्यवरांकडून सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात येते.